श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला
Shivam Updated: 15 April 2021 07:30 IST

श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला : सुरकांडी - अभंग १९७

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.

लपंडाई - अभंग १९५ ते १९६   वावडी - अभंग १९८

१९७

घेऊनियां हातीं काठी । पोरा खेळसी सुरकांडी रे ॥१॥

खेळे सुरकांडी पोरा खेळे सुरकांडी । विषयांची वासना धरुनी चढसी प्रपंचाचे झांडी ॥२॥

बुडापासुन शेंडा रे चढसी फांडोफादी रे । कामक्रोध पोरें लागती पाठींम्हणती माझा दादा रे ॥३॥

धरीं एका जनार्दनी गोडी तरी खेळ जोडा रे । वायां खेळ खेळू जाती होईल भ्रकवडी रे ॥४॥

. . .