श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला
Shivam Updated: 15 April 2021 07:30 IST

श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला : पटपट सांवली - अभंग २०२

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.

एकीबेकी - अभंग १९९ ते २०१   झोंबी - अभंग २०३

पटपट सांवली खेळूं या रे । सावध गड्यांनो कां वेळू लावा रे । भीड तया सोडोनी सहा गडी मारुं या रे ॥१॥

निजानंदी खेळोनी मित्रतनया हारुं या रे ॥धृ ॥

अवघे गडी एकवटोनी जाऊं दे या रे । बहु कष्टे फेरे फिरतां मन तेथें लावा रे ॥२॥

एका जनार्दनीं खेळतां ब्रह्मारुप काया रे । जेथें पाहे तेथें दिसे जनार्दनीं छाया रे ॥३॥

. . .