श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला
Shivam Updated: 15 April 2021 07:30 IST

श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला : गौळणींचा आकांत - अभंग २६४

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.

काला - अभंग २३२ ते २६३   गौळणींची धांदल - अभंग २६५

२६४

गौळणी म्हणती यशोदेला । कोठें गे सांवळां । कां रथ शृंगारिला ।

सांगे वो मजला । अक्रुर उभा असे बाई गे साजरी ॥१॥

बोले नंदाची आंगणीं । मिळाल्या गौळणी ॥धृ॥

बोले नंदाची पट्टराणी । सद्गदेत होउनी । मथुरेसी चक्रपाणी ।

जातो गे साजणी । विव्हळ झाले मन वचन ऐकोनी ॥२॥

अक्रुरा चांडाळा । तुज कोनी धाडिला । कां घातां करुं आलासी ।

वधिशी सकळां । अक्रुरा तुझे नाम तैशीच करणी ॥३॥

रथीं चढले वनमाळी । आकांत गोकूळीं । भूमि पडल्या व्रजबाळी ।

कोण त्या सांभाळी । नयनींच्या उदकांनें भिजली धरणी ॥४॥

देव बोले अक्रुरासी वेगें हांकी रथासी । या गोपींच्या शोकासी ।

न पहावेंमजसी । एका जनार्दनीं रथ गेला निघोनि ॥५॥

. . .