श्रीज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ
ज्ञानेश्वर Updated: 15 April 2021 07:30 IST

श्रीज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ : अभंग २२

श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.

अभंग २१   अभंग २३

नित्यनेम नामीं तो दुर्लभ असुन त्याच्याजवळ लक्ष्मीवल्लभ वास्तव्य करतात

नित्यनेम नामीं तो प्राणी दुर्लभ । लक्ष्मीवल्लभ तयाजवळी ॥१॥

नारायण हरिनामाचा जप करणार्‍याचे घरीं चारी भुक्तीमुक्ती असतात

नारायण हरि नारायण हरि । भुक्तिमुक्ति चारी घरीं त्यांच्या ॥२॥

हरि वांचुन जन्म तो नरक असुन जन्मलेला प्राणी यमाचा पाहुणा होतो

हरिविण जन्म नरकवि पै जाणा । यमाचा पाहुणा प्राणी होय ॥३॥

निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्‍वरमहाराजंना गगनाहुन वाड नाम आहे असें सांगितले.

ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड । गगनाहोनि वाड नाम आहे.

. . .