निवडक अभंग संग्रह
संकलित Updated: 15 April 2021 07:30 IST

निवडक अभंग संग्रह : दळण

निवडक अभंग संग्रह

गौळण   विनंतीचे अभंग

येई हो कान्हाई मी दळीन एकली । एकली दळितां शिणले हात लावी वहिली ॥धृ॥
वैराग्य जातें मांडुनि विवेक खुंटा थापटोनी । अनुहत दळण मांडुनी त्रिगुण वैरणी घातलें ॥१॥
स्थूळ सूक्ष्म दळियेलें देहकारणासहित । महाकारण दळियेलें औट मात्रेसहित ॥२॥
दशा दोन्ही दळिल्या व्दैत अव्दैतासहित । दाही व्यापक दळियेलें अहंसोहंसहित ॥३॥
एकवीस स्वर्ग दळियेले चवदा भुवनांसहित । सप्त पाताळें दळियेलीं सत्प सागरांसहित ॥४॥
बारा सोळा दळियेल्या सत्रवीसहित । चंद्र सूर्य दळियेले तारांगणांसहित ॥५॥
नक्षत्र वैरण घालुनी नवग्रहासहित । तेहतीस कोटी देव दळियेले ब्रम्हाविष्णुसहित ॥६॥
ज्ञान अज्ञान दळियेलें विज्ञानासहित । मीतूंपण दळियेलें जन्ममरणासहित ॥७॥
ऎसें दळण दळियेलें दोनी तळ्यासहित । एका जनार्दनी कांहीं नाहीं उरलें व्दैत ॥८॥
. . .