निवडक अभंग संग्रह
संकलित Updated: 15 April 2021 07:30 IST

निवडक अभंग संग्रह : नामधारकाची अधिकारश्रेष्ठता

निवडक अभंग संग्रह

नक्र उद्धार   मुका

गावंढे सहस्त्रब्राह्मण । तृत्प केलिया भोजन । पुण्य क्षेत्रीचा एकचि जाण । सुकृत तितुकेचि जोडे ॥१॥
ऎसे पुण्यक्षेत्रीचे दशशतक । तृत्प केलिया पाठक । पाहातां सुकृत । तितुकेचि जोडे ॥२॥
ऎसे सहस्त्रवेदपाठक । तृप्त केलिया पंडित एक । पहांता सुकृत । तितुकेचि जोडे ॥३॥
तैसेचि पंडित सहस्त्र एक । तृत्प केलिया संन्यासी देख । तरी ते सुकृत । तितुकेचि जोडे ॥४॥
तैसे सहस्त्र संन्यासी । गणित एक परमहंसी । पाहतां सुकृतांसी । एक तृप्त केलिया ॥५॥
परमहंसी सहस्त्रगणी । तैसीच ब्रह्माज्ञानाची मांडणी । जोडे सुकृत तृप्त करणी । एक ब्रह्मवेत्ता ॥६॥
उपमा देता ब्रह्मवेत्यासी । पाहता ब्रह्माडीं नाही त्यासी । तृप्त केलिया ब्रह्मवेत्यासी । हरिहर तृप्त ॥७॥
ऎसे वेत्ते अपरंपार ।  न ये नामधारका बरोबर । नामधारका सादर । पाहे एका जनार्दनी ॥८॥
. . .