निवडक अभंग संग्रह
संकलित Updated: 15 April 2021 07:30 IST

निवडक अभंग संग्रह : बहिरा

निवडक अभंग संग्रह

भजन - ज्ञानेश्‍वर माउली ज्ञानराज माउली तुकाराम ।   आरत्या

बहिरा झालों या जगीं ॥धृ॥
नाहीं ऎकिलें हरिकीर्तन । नाहीं केलें पुराणश्रवण । नाहीं वेदशास्त्रपठण । गर्भी बहिरा झालों त्यागुणे ॥१॥
नाहीं सन्तकीर्ति श्रवणीं आलीं । नाही साधुसेवा घडियेली पितृवचनासी पाठ दिधली । तीर्थ व्रतें असोनि त्यागिलीं ॥२॥
माता माउली पाचारितां । शब्द नाहीं दिला मागुता । बहिरा झालों नरदेहीं येता । एका जनर्दनीं स्मरेन आतां ॥३॥
. . .