समश्लोकी भगवद्‌गीता
संकलित Updated: 15 April 2021 07:30 IST

समश्लोकी भगवद्‌गीता : कोण तू----?

संस्कृत भाषेतील गीतेचे पद्यरूपात मराठी भाषेत रूपांतर करण्याचे अवघड कार्य सदाशिवराव परांजपे यांनी केले.

समश्लोकी भगवद्गीता अध्याय अठरावा   अध्याय पहिला

ग्रह-भोवर्‍यांचा खेल अधान्तरी

कोण तू गारोडी खेळणारा ?

हंडयाझुंबरांचे अंबराला छत

कोण तू श्रीमंत लावणारा ?

सुगंधी शीतळ वार्‍याचे विंझण

विलासी तू कोण सोडणारा ?

दिव्य रंगाकृति व्योमपटावरी

कोण तू चितारी काढणारा ?

विश्वाचि ही बाग सदा फुललेली

कोण तू गा माळी ठेवणारा ?

. . .