मराठी आरती संग्रह
संकलित Updated: 15 April 2021 07:30 IST

मराठी आरती संग्रह : गजानन महाराजांची भूपाळी

मराठी आरती संग्रह

गजानन महाराजांचे भजन   आरती श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची

उठा उठा हो सद्गुरुराया सरली ती राती॥
दयाळा उष:कालचा वाहे वारा कुक्कुट ओरडती॥धृ॥

सूर्य सारथी अरुणा पाहून प्राची निजचित्ती॥
गेला होऊन अति आनंदित तें मी वानुं किती॥१॥

उलुक पिंगळे झाले भयभित पाहून अरुणाला।
प्राचि प्रांत तो सद्गुरुराया लालिलाल झाला॥२॥

चक्रवाक चंडोल पक्षि ते प्रभात कालाला।
सूर्या बघण्या आतुर होऊनि घालिती घिरट्याला॥३॥

तेवीं बघण्या तुला पातले भक्त तुझे द्वारी।
दर्शन देउनि तयास तारा गणु म्हणे संसारी॥४॥

. . .