मराठी आरती संग्रह
संकलित Updated: 15 April 2021 07:30 IST

मराठी आरती संग्रह : आरती श्रीएकनाथांची

मराठी आरती संग्रह

तुळसीची आरती   आरती श्रीतुकारामांची

आरती एकनाथा।
महाराजा समर्था॥
त्रिभुवनी तूचि थोर।
जगद्गुरु जगन्नाथा॥धृ॥

एकनाथ नामसार।
वेदशास्त्रांचे गूज॥
संसारदु:ख नासे।
महामंत्राचे बीज॥१॥

एकनाथनाम घेता।
सुख वाटले चित्ता।
अनंत गोपाळदासा।
धणी न पुरे आता॥२॥

. . .