मराठी आरती संग्रह
संकलित Updated: 15 April 2021 07:30 IST

मराठी आरती संग्रह : आरती समर्थांची

मराठी आरती संग्रह

आरती श्रीतुकारामांची   घालीन लोटांगण

आरती रामदासा।
भक्तविरक्त ईशा॥
उगवला ज्ञानसूर्य।
उजळोनी प्रकाशा॥धृ॥

साक्षात शंकराचा।
अवतार मारूती॥
कलिमाजी तेचि झाली।
रामदासांची मूर्ती॥१॥

वीसही दशकांचा।
दासबोध ग्रंथ केला॥
जडजीवा उध्दरीले।
नृप शिवासी तारिले॥२॥

ब्रह्मचर्य व्रत ज्याचे।
रामरूप सृष्टि पाहे।
कल्य़ाण तिही लोकी।
समर्थ सद्गुरुपाय॥३॥

. . .