चतुःश्लोकी भागवत
एकनाथ महाराज Updated: 15 April 2021 07:30 IST

चतुःश्लोकी भागवत : हरिकृपेशिवाय अनुताप नाहीं

मराठी बहुजनसमाजांत श्रद्धा, भक्ति, प्रेम, समता आणि विश्वबंधुत्वाचें अतूट नाते निर्माण करणारे सत्पुरूष म्हणजे पैठणचे महाभागवत श्रीएकनाथमहाराज हेच होत.

किंकर्तव्यमूढ ब्रह्मदेवाचा भगवंताचा धांवा   चित्तशुद्धीशिवाय हरीची भेट नाहीं

जंव हरी हदयीं कृपा न करी । तंव अनुताप नुपजे शरीरीं । त्याची पूर्ण कृपा ज्यावरी । तो विषयीकांकुरीं वीतरागी ॥७२॥

विवेकाविण वैराग्य उठी । तें अपायीं घाली कडेकपाटीं । कीं वैराग्यविण विवेक उठी । तो जन्मला पोटी नपुंसक ॥७३॥

विवेकाविण वैराग्य आंधळे । वैराग्याविण विवेक पांगुळें । हें एकएका अवेगळें । झाल्याविण नकळे परमार्थ ॥७४॥

जे कृष्णकृपा पूर्ण घडे । तै विवेकवैराग्य समपाडें । हदयी वाढती वाडेंकोडें । तै ब्रह्म आतुडे तत्काळ पूर्ण ॥७५॥

वैराग्यविण जे स्थिती । त्यांतें गिळी विषयशक्ती । विवेकहीन वैराग्यस्थिती । ते जंतू पडती अंधत्वें ॥७६॥

जें कृष्णकृपा पूर्ण आकळें । तें विवेक वैराग्य एके वेळे । जें हदयी वाढे प्रांजळें । तें परब्रह्म लोळे दोंदावरी ॥७७॥

तेणें श्रीनारायणें आपण । ब्रह्मयावरी कृपा केली पूर्ण । कमळासनीं बैसोनि जाण । झाला विवेकसंपन्न वीतरागी ॥७८॥

. . .