चतुःश्लोकी भागवत
एकनाथ महाराज Updated: 15 April 2021 07:30 IST

चतुःश्लोकी भागवत : गुरुकृपेशिवाय इतर साधनें व्यर्थ

मराठी बहुजनसमाजांत श्रद्धा, भक्ति, प्रेम, समता आणि विश्वबंधुत्वाचें अतूट नाते निर्माण करणारे सत्पुरूष म्हणजे पैठणचे महाभागवत श्रीएकनाथमहाराज हेच होत.

नारद ब्रह्मज्ञानी झाल्यामुळें ब्रह्मदेवानें आनंदानें त्याला आपली ब्रह्मवीणा दिली   अशा अनुतापी व्यासांना नारदांचें दर्शन होतें

गुरुकृपेशिवाय इतर साधनें व्यर्थ

सदगुरुकृपा न होतां पूर्ण । न तुटे सूक्ष्म ज्ञानाभिमान । नकरितां गुरुसेवा अनन्य । शिष्य समाधान कदा नपवे ॥४२॥

नधरितां सदगुरुचे चरण । नव्हतां अनन्यशरण । वृथा ज्ञान वृथा ध्यान । वृथा वाग्विलपन पांडित्य तें ॥४३॥

वृथा स्वधर्मकर्माचार । वृथा विवेक विचार । सदगुरुकृपेविण जो नर । भूमिभार जडमूढ तो ॥४४॥

सदगुरुकृपा न होतां । व्यर्थ कविता व्यर्थ कथा । व्यर्थ सज्ञानश्लाघ्यता । देहअहंता तुटेना त्याची ॥४५॥

नकरितां सदगुरुभजन । शिष्यासी नोहे समाधान । सदगुरुतोचि ब्रह्मपूर्ण । चैतन्यघन निजात्मा तो ॥४६॥

सदगुरुचे चरणींची माती । अवचटें आतुडल्या स्वहातीं । पायां लागती चार्‍ही मुक्ती । परमात्मप्राप्ती सच्छिष्या ॥४७॥

असो हें व्यासें करितां ध्यान । क्षणभरी स्थिर न राहे मन । अणुमात्र नपवे समाधान । तेणें उद्विग्नपणें अनुतापी ॥४८॥

मग ह्नणे तो कटकटां । जळो जाणीवप्रतिष्ठा । ज्ञातेपणें ठकिलों मोठा । मज मी उफराटा वंचलों कीं ॥४९॥

जाणपणाचा पहिला भ्रम । ज्ञातेपणें मी मूर्ख परम । निजहिताचें चुकलों वर्म । झालें निंद्यकर्म मज माझें ॥८५०॥

माझे देही देहस्थ मी कोण । त्या मीपणाचें मज नाहीं ज्ञान । केवीं पावेन मी समाधान । यापरी संपूर्ण अनुताप जाहला ॥५१॥

नरदेहीचें निजसाधन । साधावें निजात्मज्ञान । तें मी नसाधितां सज्ञान । अतिअज्ञान ज्ञानांध केवळ ॥५२॥

. . .