श्रीएकनाथी भागवत
एकनाथ महाराज Updated: 15 April 2021 07:30 IST

श्रीएकनाथी भागवत : श्लोक २ रा

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.

श्लोक १ ला   श्लोक ३ रा

श्रीबादरायणिरुवाच

कृत्वा दैत्यवंधं कृष्णः सरामो यदुभिर्वृतः ।

भुवोऽवतारयद्भारं जविष्ठं जनयन्कलिम् ॥१॥

पूर्णब्रह्म स्वयें श्रीकृष्ण । बळी बळिराम लोकरमण ।

निधडे यादव मेळवूनि जाण । दैत्यनिर्दळण श्रीकृष्णें केलें ॥३॥

जे यादवांसि न येत वधीं । तेथें श्रीकृष्ण करी बुद्धि ।

सखे स्वजन स्वगोत्रामधीं । कलह उत्पादी अतिघोर ॥४॥

उतरावया धराभार । कलहमिसें शारंगधर ।

मारवी कौरवभार । पांडुकुमर क्षोभवूनि ॥५

. . .