श्रीएकनाथी भागवत
एकनाथ महाराज Updated: 15 April 2021 07:30 IST

श्रीएकनाथी भागवत : श्लोक २५ वा

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.

श्लोक २४ वा   श्लोक २६ वा

 

तान्दृष्टवा सूर्यसंकाशान्महाभागवतान्नृप ।

यजमानोऽग्नयो विप्राः सर्व एवोपतस्थिरे ॥२५॥

अमित सूर्यांचिया कोटी । हारपती नखतेजांगुष्ठीं ।

तो भगवंत जिंहीं धरिला पोटीं । त्यांची तेजाची गोष्टी अलोलिक ॥९६॥

त्यांचिया अंगप्रभा । सूर्य लोपताहे उभा ।

जिंहीं प्रभेसी आणिली शोभा । चैतन्यगाभा साकार ॥९७॥

नवखंड पृथ्वीचे अलंकार । नवनिधींचें निजसार ।

नवरत्‍नांचेंही निजभांडार । तें हे साकार नवही जण ॥९९॥

कीं ते नवही नारायण । स्वयें प्रगटले आपण ।

नवही नृसिंह जाण । देदीप्यमान पैं आले ॥२००॥;

आव्हानिले तिन्ही अग्नी । उभे ठेले त्यांतें देखोनी ।

ते हे भागवतीं देखिले नयनीं । इतरांलागुनी दिसेना ॥१॥

येतां देखोनि तेजोमूर्ती । ऋत्विज आचार्य उभे ठाकती ।

साउमा धांवे विदेहनृपती । स्वानंदवृत्ती सन्मानी ॥२॥

सवेग घाली लोटांगण । मुगुट काढोनि आपण ।

मस्तकीं वंदूनियां चरण । पूर्णादरें जाण आणिता झाला ॥३॥

 

. . .