श्रीएकनाथी भागवत
एकनाथ महाराज Updated: 15 April 2021 07:30 IST

श्रीएकनाथी भागवत : श्लोक २६ वा

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.

श्लोक २५ वा   श्लोक २७ वा

विदेहस्तानभिप्रेत्य नारायणपरायणान् ।

प्रीतः संपूजयांचक्र आसनस्थान्यथाऽर्हतः ॥२६॥

त्यांतें जाणोनि भगवत्पर । विदेहा आल्हाद थोर ।

त्यांचे पूजेसी अत्यादर । स्वयें सादर पैं झाला ॥४॥

श्रद्धायुक्त चरणक्षालन । धूप दीप सुमन चंदन ।

पूजा मधुपर्कविधान । केलें संपूर्ण यथायोग्य ॥५॥;

. . .