श्रीएकनाथी भागवत
एकनाथ महाराज Updated: 15 April 2021 07:30 IST

श्रीएकनाथी भागवत : श्लोक ४७ वा

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.

श्लोक ४६ वा   श्लोक ४८ वा

अर्चायामेव हरये पूजां यः श्रद्धयेहते ।

न तद्भक्तेषु चान्येषु स भक्तः प्राकृतः स्मृतः ॥४७॥

पाषाणप्रतिमा हाचि देवो । तेथेंचि ज्याचा पूर्ण भावो ।

भक्त-संत-सज्जनांसी पहा वो । अणुमात्र देहो लवों नेदी ॥५३॥

ते ठायीं साधारण जन । त्याची वार्ता पुसे कोण ।

त्यांसी स्वप्नींही नाहीं सन्मान । यापरी भजन प्राकृताचें ॥५४॥

ऐशिया स्थितीं जो जड भक्तु । तो जाणावा मुख्य ’प्राकृतु’ ।

प्रतिमाभंगें अंतु । मानी निश्चितु देवाचा ॥५५॥

यापरी त्रिविध भक्त । सांगितले भजनयुक्त ।

परी उत्तमांचीं लक्षणें अद्भुत । तीं सांगावया चित्त उदित माझें ॥५६॥;

. . .