श्रीएकनाथी भागवत
एकनाथ महाराज Updated: 15 April 2021 07:30 IST

श्रीएकनाथी भागवत : श्लोक ९ वा

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.

श्लोक ८ वा   श्लोक १० वा

शतवषा ह्यनावृष्टिर्भविष्यत्युल्बणा भुवि ।

तत्कालोपचित्तोष्णार्को लोकांस्त्रीन्प्रतपिष्यति ॥९॥

काळक्षोभाचिये दृष्टि । शतवर्षें अनावृष्टी ।

तेणें अत्युल्बणें आटे सृष्टी । पृथ्वीच्या पोटीं कांहीं नुरे ॥५८॥

प्राणिमात्र निमाले देख । वनें वाळूनि जाहली राख ।

बिंदुमात्र न मिळे उदक । यापरी लोक आटिले काळें ॥५९॥

तंव द्वादशादित्यमेळा । मंडळीं झाला एकवेळा ।

तेथींच्या किरणीं प्रबळा । त्रैलोक्या सकळा संतप्त केलें ॥१६०॥

येती उष्णाचिया आह्मा । होती पर्वतांच्या लाह्या ।

तेणें धरातळ लवलाह्या । भस्म झालें राया महाउष्णें ॥६१॥

. . .