
एकनाथ महाराज
Updated: 15 April 2021 07:30 IST
श्रीएकनाथी भागवत : श्लोक १० वा
ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.
पातालतलमारभ्य संकर्षणमुखानलः ।
दहन्नूर्ध्वशिखो विष्वग्वर्धते वायुनेरितः ॥१०॥
उष्णें तापलें पृथ्वीतळ । पोळलें शेषफणामंडळ ।
तैं सहस्त्रमुखें विषानळ । अग्निकल्लोळ वमिता झाला ॥६२॥
पाताळतळींहूनि देखा । ऊर्ध्वमुख अग्निशिखा ।
जाळीतचि तिहीं लोकां । उठिला भडका अनिवार ॥६३॥
क्षोभें दिधला फूत्कारा । सहस्त्रमुखें सुटला वारा ।
तो साह्य झाला त्या वैश्वानरा । जाळीत दिगंतरा वाढला वणवा ॥६४॥
. . .