श्रीएकनाथी भागवत
एकनाथ महाराज Updated: 15 April 2021 07:30 IST

श्रीएकनाथी भागवत : श्लोक १९ वा

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.

श्लोक १८ वा   श्लोक २० वा

राजोवाच-कस्मिन्काले स भगवान् किं वर्णः कीदृशो नृभिः ।

नाम्ना वा केन विधिना पूज्यते तदिहोच्यताम् ॥१९॥

ज्याचेनि स्मरणें तत्त्वतां । कर्माकर्में नुधविती माथा ।

त्या भगवंताची कथा । माझिया हितालागीं सांगा ॥६॥

जो परमात्मा श्रीहरी । तो सृष्ट्यादि युगयुगांतरीं ।

कोणें नामें रूपें वर्णाकारीं । भक्त कैशापरी पूजिती ॥७॥

आणि ते काळींच्या प्रजा । कैसेनि यजिती अधोक्षजा ।

कवणे विधीं करिती पूजा । तें योगिराजा सांगिजे ॥८॥

तुमचे मुखींचें कृपावचन । त्यापुढें अमृतही गौण ।

वचनें परमानंद पूर्ण । जन्ममरण उच्छेदी ॥९॥

त्याहीमाजीं भगवद्गुण । युगानुवर्ती नारायण ।

त्याचें भजनपूजनविधान । कृपा करून सांगिजे स्वामी ॥३१०॥

ऐकोनि रायाचें वचन । संतोषले अवघे जण ।

जाणोनि हरिगुणांचा प्रश्र्न । कनिष्ठ 'करभाजन' बोलता झाला ॥११॥

. . .