श्रीएकनाथी भागवत
एकनाथ महाराज Updated: 15 April 2021 07:30 IST

श्रीएकनाथी भागवत : श्लोक २४ वा

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.

श्लोक २३ वा   श्लोक २५ वा

त्रेतायां रक्तवर्णोऽसौ, चतुर्बाहुस्त्रिमेखलः ।

हिरण्यकेशस्त्रय्यात्मा स्त्रुक्‌स्त्रुवाद्युपलक्षणः ॥२४॥

त्रेतीं यज्ञमूर्तिं पुरुषोत्तमु । रक्तवर्ण ज्वलनोपमु ।

पिंगटकेश निर्धूमु । देवदेवोत्तमु चतुर्बाहू ॥२४॥

तया यज्ञपुरुषा निर्मळा । त्रिगुणांची त्रिमेखळा ।

वेदत्रयीचा पूर्णमेळा । मूर्तीचा सोहळा तदात्मकचि ॥२५॥

स्त्रुक-स्त्रुवा-पाणिग्रहण । हेंचि तयाचें उपलक्षण ।

त्रेतायुगीं नारायण । येणें रूपें जाण निजभक्त ध्याती ॥२६॥

. . .