श्रीएकनाथी भागवत
एकनाथ महाराज Updated: 15 April 2021 07:30 IST

श्रीएकनाथी भागवत : श्लोक २८ वा

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.

श्लोक २७ वा   श्लोक २९ वा

तं तदा पुरुषं मर्त्या, महाराजोपलक्षणम् ।

यजन्ति वेदतंत्राभ्यां, परं जिज्ञासवो नृप ॥२८॥

शशांकछत्र मणि चामर । राजलक्षणीं राजोपचार ।

यापरी द्वापरींचे नर । अतिसादर पूजेसी ॥३४॥

शीघ्र पावावया परात्पर । वैदिक तांत्रिक पूजा मिश्र ।

तत्त्वजिज्ञासु करिती नर । भजनतत्पर या रीतीं ॥३५॥

ते काळीचें नामस्मरण । जेणें होई कलिमलदहन ।

त्या नामांचें अभिधान । ऐक सांगेन नृपनाथा ॥३६॥

. . .