श्रीएकनाथी भागवत
एकनाथ महाराज Updated: 15 April 2021 07:30 IST

श्रीएकनाथी भागवत : श्लोक १३ वा

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.

श्लोक १२ वा   श्लोक १४ वा

श्रीशुक उवाच ।

इत्यादिष्टो भगवता महाभागवतो नृप ।

उद्धवः प्रणिपत्याह तत्त्वंजिज्ञासुरच्युतम् ॥१३॥

शुक म्हणे कौरवनाथा । कृपा उपजली भगवंता ।

उपदेशिलें महाभागवता । ज्ञानकथा निजबोधू ॥५९॥

तें ऐकोनि उद्धव । श्रवणीं थोर उठी हांव ।

कैसें बोलिला ज्ञानगौरव । अतिअपूर्व श्रीकृष्ण ॥६०॥

श्रीकृष्ण श्रीमुखें सांगे कोड । तें निरूपण अतिगोड ।

जीवीं उठली श्रवणचाड । नुल्लंघी भीड देवाची ॥६१॥

आवडीं कळवळे चित्त । घाली साष्टांग दंडवत ।

हात जोडोनि पुसत । प्रेमळ भक्त उद्धव ॥६२॥

. . .