श्रीएकनाथी भागवत
एकनाथ महाराज Updated: 15 April 2021 07:30 IST

श्रीएकनाथी भागवत : श्लोक २४ वा

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.

श्लोक २३ वा   श्लोक २५ वा

अत्राप्युदाहरन्तीममितिहासं पुरातनम् ।

अवधूतस्य संवादं यदोरमिततेजसः ॥२४॥

हरिखें म्हणतसे गोविंदू । उद्धवा आमुचा पूर्वज यदू ।

तेणें ब्रह्मज्ञानासी संवादू । केला विशदू अवधूतासीं ॥५५॥

राजा यदू म्हणसी कैसा । क्षात्रसृष्टीचा सूर्यो जैसा ।

राज चंद्राच्या प्रकाशा । निजतेजवशा लोपितू ॥५६॥

तेणें गुरूचीं लक्षणें ऐकतां । सायुज्यमुक्ति आली हाता ।

ते हे पुरातन कथा । तूज मी आतां सांगेन ॥५७॥

. . .