श्रीएकनाथी भागवत
एकनाथ महाराज Updated: 15 April 2021 07:30 IST

श्रीएकनाथी भागवत : श्लोक ६१ वा

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.

श्लोक ६० वा   श्लोक ६२ वा

स्नेहानुबद्धहृदयावन्योन्यं विष्णुमायया ।

विमोहितौ दीनधियौ शिशून् पुपुषतूः प्रजाः ॥६१॥

अजाची जे अजा माया । त्या कैसी भुलवी राया ।

अन्योन्यस्नेह बांधोनि हृदया । पिलीं पोसावया उद्यत ॥८६॥

स्त्रीपुत्रांचा मोह गहन । त्यांचें करावया पोषण ।

चिंतातूर अतिदीन । करी भ्रमण अन्नार्थ ॥८७॥

. . .