श्रीएकनाथी भागवत
एकनाथ महाराज Updated: 15 April 2021 07:30 IST

श्रीएकनाथी भागवत : श्लोक ७ वा

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.

श्लोक ५ वा व ६ वा   श्लोक ८ वा

ते नाधीतश्रुतिगणा नोपासितमहत्तमाः ।

अव्रतातप्ततपसः मत्सङ्गान्मामुपागताः ॥७॥

तिंहीं नाहीं केलें वेदपठण । नाहीं गुरु केले केवळ शास्त्रज्ञ ।

व्रततपादि नाना साधन । नाहीं जाण तिंहीं केलें ॥४॥

केवळ गा सत्संगतीं । मज पावल्या नेणों किती ।

एकभावें जे भावार्थी । त्यांसी मी श्रीपती सुलभू ॥५॥

. . .