श्रीएकनाथी भागवत
एकनाथ महाराज Updated: 15 April 2021 07:30 IST

श्रीएकनाथी भागवत : श्लोक ११ वा

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.

श्लोक १० वा   श्लोक १२ वा

महत्यात्मन्मयि परे यथासंस्थं मनो दधत् ।

महिमानमवाप्नोति भूतानां च पृथक् पृथक् ॥११॥

माझें स्वरूप अनंत अपार । महत्तत्त्वाहोनि अतिथोर ।

आणि महत्तत्त्वाचाहीं साचार । नियंता ईश्वर जो कां मी ॥७१॥

हे सिद्धी साधावया जो नर । माझी धारणा धरी अपरंपार ।

तेवढेंच होय त्याचें शरीर । हे सिद्धी महाथोर महिमान ॥७२॥

सूक्ष्म कापुसाचे तंतू पाहें । तो कल्पनेऐसा पटू होये ।

माझी महती धारणा वाहे । तो माझी सिद्धी लाहे महिमत्वें ॥७३॥

तुकितां त्याच्या समान भारा । न पुरे सपर्वत सगळी धरा ।

एवढ्या महत्तत्त्वांचा उभारा । सिद्धिद्वारा तो पावे ॥७४॥

. . .