श्रीएकनाथी भागवत
एकनाथ महाराज Updated: 15 April 2021 07:30 IST

श्रीएकनाथी भागवत : श्लोक १४ वा

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.

श्लोक १३ वा   श्लोक १५ वा

महत्यात्मनि यत्सूत्रे धारयन्मयि मानसम् ।

प्राकाश्यं पारमेष्ठ्यं मे विन्दतेऽव्यक्तजन्मनः ॥१४॥

जें महत्तत्त्व गा जाण । तें मायेचें प्रथम स्फुरण ।

ज्यासी क्रिया सूत्रप्रधान । नामाभिधान बोलती ॥८३॥

तेथ अजन्मा मी आपण । जाहलों सूत्राचा सूत्रात्मा जाण ।

त्या माझ्या स्वरूपाचें ध्यान । सावधान जो करी ॥८४॥

ज्या सूत्राचेनि प्रकाशप्रवाहें । ब्रह्मांड हिरण्यगर्भ प्रकाशला राहे ।

ते प्रकाशता त्यासी वश्य होये । येणें सूत्रात्मा पाहे निदिध्यासनें ॥८५॥

त्या निदिध्यासनापोटीं । करूं शके ब्रह्मांडकोटी ।

एवढी प्रकाशसिद्धी गोमटी । हे मजवीण नुठी साधकां ॥८६॥

. . .