
एकनाथ महाराज
Updated: 15 April 2021 07:30 IST
श्रीएकनाथी भागवत : श्लोक २१ वा
ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.
मनो मयि सुसंयोज्य देहं तदनु वायुना ।
मद्धारणानुभावेन तत्रात्मा यत्र वै मनः ॥२१॥
अत्यंत सवेग तें मन । त्या मनाचेंही मी मन जाण ।
त्या मनासी मजसीं अभिन्न । प्राणधारणयुक्त राखे ॥१६॥
ऐसें प्राणधारणयुक्त मन । मजसीं राखतां अभिन्न ।
त्या धारणाप्रभावें जाण । मनोवेगें गमन देहासी होय ॥१७॥
जेथें संकल्पें जाय मन । तेथें होय देहाचेंही गमन ।
हे मनोजवसिद्धी जाण । धारणालक्षण या हेतू ॥१८॥
. . .