श्रीएकनाथी भागवत
एकनाथ महाराज Updated: 15 April 2021 07:30 IST

श्रीएकनाथी भागवत : श्लोक ९ वा

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.

श्लोक ७ व ८ वा   श्लोक १० वा

अहमात्मोद्धवामीषां भूतानां सुहृदीश्वरः ।

अहं सर्वाणि भूतानि तेषां स्थित्युद्‍भवाप्ययः ॥९॥

मी हृदयस्थ समर्थ हृदयीं । त्या मज जीवू मागें जें कांही ।

त्यासी विमुख मी नव्हें कहीं । पुरवीं सर्वही ईश्वरत्वें ॥५१॥

जीवू अतिअडलेपणें । जें मागे मजकरणें ।

तें मी त्यासी अलोट देणें । यालागी म्हणणें ईश्वर मज ॥५२॥

मी आत्मा असें हृदयीं । हा विश्वास जयांसी नाहीं ।

ते मृगजळाचे डोहीं । नावेसकट पाहीं बुडबुडों गेले ॥५४॥

माझे प्राप्तीचे मुख्य वर्म । मी हृदयीं असें परब्रह्म ।

हेंचि ज्याचे नित्य कर्म । तो विभूती मरम पैं माझी ॥५५॥

मी सर्वभूतहृदयवासी । सुहृद सोयरा मी सर्वांसी ।

नियंता ईश्वरसत्तेसी । नियामक भूतांसी मी एक ॥५६॥

एवं सर्व भूतांचा मी स्वामी । इयें सर्व भूतें तेंही मी ।

भूतांचे जन्मभूमीची मी भूमी । उत्पत्त्यादि कर्मीं मी कर्ता ॥५७॥

कृषीवळाचियेपरी । मी सृजीं पाळीं संहारीं ।

ब्रह्मा विष्णु त्रिपुरारी । गुणावतारी मी एक ॥५८॥

कर्माची जे क्रियाशक्ती । ते मी म्हणे श्रीपती ।

हे साम्यें बोलिली स्थिती । विशेष विभूती त्या ऐक ॥५९॥

. . .