श्रीएकनाथी भागवत
एकनाथ महाराज Updated: 15 April 2021 07:30 IST

श्रीएकनाथी भागवत : श्लोक १५ वा

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.

श्लोक १४ वा   श्लोक १६ वा

सिद्धेश्वराणां कपिलः सुपर्णोऽहं पतत्रिणाम् ।

प्रजापतीनां दक्षोऽहं पितॄणामहमर्यमा ॥१५॥

सिद्धांमाजीं कपिल मुनीश्वर । तो मी म्हणे सारंगधर ।

पक्ष्यांमाजीं खगेश्वर । तो मी श्रीधर गरुडरूपें ॥८१॥

प्रजापतींमाजी मुख्य । कृष्ण म्हणे तो मी दक्ष ।

पितृगणांमाजीं अध्यक्ष । अर्यमा प्रत्यक्ष स्वरूप माझे ॥८२॥

. . .