श्रीएकनाथी भागवत
एकनाथ महाराज Updated: 15 April 2021 07:30 IST

श्रीएकनाथी भागवत : श्लोक २३ वा

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.

श्लोक २२ वा   श्लोक २४ वा

यज्ञानां ब्रह्मयज्ञोऽहं व्रतानामविहिंसनम् ।

वाय्वग्न्यर्काम्बुवागात्मा शुचीनामप्यहं शुचिः ॥२३॥

यज्ञांमाजीं ब्रह्मयज्ञ । तो मी म्हणे सर्वज्ञ ।

देवर्षिपितृभूतगण । आब्रह्म भुवन जेणें तृप्त ॥९८॥

जीवमात्रासी पैं जाणे । नेदावे दुःखवचन ।

व्रतांमाजीं जें अविहिंसन । ते मी श्रीकृष्ण स्वयें म्हणे ॥९९॥

एका वायूचेनि पवित्रपण । एक अग्नीस्तव पवित्र जाण ।

एकातें पवित्र करी जीवन । एक पावन वचनमात्रें ॥२००॥

एक बुद्धिस्तव पवित्र जाण । या समस्तांमाजीं पवित्रपण ।

तें माझे स्वरूप म्हणे श्रीकृष्ण । पावना पावन मी एक ॥१॥

जग माझेनि नामें पुनीत । हें सर्वांचे संमत ।

त्या माझें स्वरूप जें येथ । परम पुनीत पुनीतां ॥२॥

. . .