
एकनाथ महाराज
Updated: 15 April 2021 07:30 IST
श्रीएकनाथी भागवत : श्लोक २५ वा
ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.
स्त्रीणां तु शतरूपाहं पुंसां स्वायम्भुवो मनुः ।
नारायणो मुनीनां च कुमारो ब्रह्मचारिणाम् ॥२५॥
शतरूपा आणि मनू । इयें दोनी मी म्हणे जनार्दनू ।
मुनींमाजीं मी नारायणू । बदरी सेवुनू सदा असे ॥८॥
नैष्ठिक ब्रह्मचर्यधर । माझें स्वरूप सनत्कुमार ।
स्वयें सांगताहे श्रीधर । जाण साचार उद्धवा ॥९॥
. . .