श्रीएकनाथी भागवत
एकनाथ महाराज Updated: 15 April 2021 07:30 IST

श्रीएकनाथी भागवत : श्लोक ९ वा

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.

श्लोक ८ वा   श्लोक १० व ११ वा

श्रीभगवानुवाच-

धर्म एष तव प्रश्नो नैःश्रेयसकरो नृणाम् ।

वर्णाश्रमाचारवतां तमुद्धव निबोध मे ॥९॥

जेवीं कां पुत्र एकुलता । त्यासी कांहीं वंचीना माता ।

तेवीं उद्धव श्रीकृष्णनाथा । त्याचें वचन वृथा हों नेदी ॥५९॥

हरिखें म्हणे सारंगपाणी । धन्य धन्य उद्धवा तुझी वाणी ।

मोक्षमार्गींची निशाणी । हे जनालागोनी त्वां केली ॥६०॥

तुझ्या प्रश्नाचें प्रश्नोत्तर । वर्णाश्रमी जे कोणी नर ।

त्यांसी स्वधर्मचि मोक्षकर । ऐक साचार सांगेन ॥६१॥

कल्पादिपासोनि स्वधर्मसंस्था । पुरातनयुगवर्ती कथा ।

तुज मी सांगेन तत्त्वतां । ऐक आतां उद्धवा ॥६२॥

. . .