श्रीएकनाथी भागवत
एकनाथ महाराज Updated: 15 April 2021 07:30 IST

श्रीएकनाथी भागवत : श्लोक ३१ वा

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.

श्लोक ३० वा   श्लोक ३२ वा

यद्यसौ छन्दसां लोकमारोक्ष्यन् ब्रह्मविष्टपम् ।

गुरवे विन्यसद्देहं स्वाध्यायार्थं बृहद्‌व्रतः ॥३१॥

जरी ब्रह्मचारी व्रतस्थ । येणेंचि आश्रमें निश्चित ।

सत्यलोक वैकुंठपर्थंत । वांछी वेदोक्त मत्प्राप्ती ॥२७॥

तेणें यावज्जन्म आपण । दृढ करावें गुरुभजन ।

निजदेहाचेंही जाण । करी समर्पण गुरुचरणीं ॥२८॥

सद्‍गुरुभजनाची परवडी । नित्य नूतन आवडी ।

निजात्मभावें चोखडी । लागली गोडी गुरुचरणीं ॥२९॥

पूर्वील व्रतें धरी । तेंचि व्रत दृढ करी ।

होय नैष्ठिक ब्रह्मचारी । गुरुभजनावरी निर्धारु ॥३३०॥

न मनी सन्मानाचें कोड । न म्हणे विषय गोड ।

न धरी संसाराची चाड । व्रतीं दृढ व्रतस्थ ॥३१॥

ऐसा थोर व्रतें व्रतधर । तैसाचि गुरुभजनीं सादर ।

करी सद्‍गुरूशीं विचार । वेदांतसार स्वाध्यायें ॥३२॥

`स्व' म्हणिजे आत्मा जाण । ते ठायीं नित्य अनुसंधान ।

तो `स्वाध्याय' म्हणती सज्ञान । ज्ञानविचक्षण निजद्रष्टे ॥३३॥

ऐशिया साधकासी जाण । सर्वत्र ब्रह्मभावन ।

हेंचि स्वमुखें मधुसूदन । स्वयें आपण सांगता ॥३४॥

. . .