
एकनाथ महाराज
Updated: 15 April 2021 07:30 IST
श्रीएकनाथी भागवत : श्लोक ३७ वा
ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.
ध्यायन्मनोऽनुविषयान् दृष्टान्वाऽनुश्रुतानथ ।
उद्यत्सीदत् कर्मतन्त्रं स्मृतिस्तदनुशाम्यति ॥३७॥
श्रुतदृष्टविषयांचें ध्यान । निरतंर वाढवी मन ।
तीव्र धारण दारुण । अन्य स्फुरण स्फुरेना ॥३१॥
आवडत्या विषयांचें ध्यान । अंतकाळीं ठसावे जाण ।
तेव्हां तदाकार होय मन । सर्वभावें आपण तन्निष्ठा ॥३२॥
तेव्हां भोगक्षयें जाण । मागल्या देहाचा अभिमान ।
सहजेंचि विसरे मन । पुढील ध्यान एकाग्रतां ॥३३॥
विषयवासनारुढ मन । निजकर्मतंत्रें जाण ।
देहांतरीं करी गमन । तेथ सप्राण संचरे ॥३४॥
मागील सांडिल्या देहातें । सर्वथा स्मरेना चित्तें ।
पुढें धरिलें आणिकातें । हेंही मनातें स्मरेना ॥३५॥;
. . .