श्रीएकनाथी भागवत
एकनाथ महाराज Updated: 15 April 2021 07:30 IST

श्रीएकनाथी भागवत : श्लोक ५२ वा

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.

श्लोक ५१ वा   श्लोक ५३ वा

नृत्यतो गायतः पश्यन् यथैवानुकरोति तान् ।

एवं बुद्धिगुणान्पश्यन्ननीहोऽप्यनुकार्यते ॥५२॥

कलाकुशल सभानायक । त्यापुढें रंग होता कौतुक ।

गात्या नाचत्याचे तालथाक । स्वयें देख अनुकरे ॥८॥

तेंचि अनुकार म्हणशी कैसें । प्रकृति केवळ जडांशें ।

जाणपण आत्म्यासी असे । येणें विन्यासें भोक्ता म्हणती ॥९॥

सभेसी बैसल्या निश्चळा । रंगींच्या अनुकरे थाकताळा ।

तेवीं प्रकृति पुरुष वेगळा । तो प्रकृतीची लीळा अनुकरे ॥६१०॥

आशंका ॥ प्रकृतिच्छंदें अनुकारता । गुणकर्मांचा फळभोक्ता ।

आत्मा झाला जैं तत्त्वतां । तैं नित्यमुक्तता भंगली ॥११॥

जो करी कर्मफळस्वादन । त्यासी लागे कर्मबंधन ।

कर्मास्तव जन्ममरण । आत्म्यासी जाण लागलें ॥१२॥

नित्यमुक्त अविकारी । या गोष्टी राहिल्या दूरी ।

आत्मा जाहला संसारी । गुणविकारीं अतिबद्ध ॥१३॥

उद्धवा तूं ऐसऐशी । आशंका झणीं धरिशी ।

आत्मा अलिप्त गुणकर्मांसी । दृष्टांतेंसीं हरि सांगे ॥१४॥;

. . .