
एकनाथ महाराज
Updated: 15 April 2021 07:30 IST
श्रीएकनाथी भागवत : श्लोक ३ रा
ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.
निःसृतं ते मुखाम्भोजाद्यदाह भगवानजः ।
पुत्रेभ्यो भृगुमुख्येभ्यो, देव्यै च भगवान भवः ॥३॥
तुवांचि कल्पाचिया आदीं । हेचि पूजाविधानविधी ।
उपदेशिला पुत्रबुद्धीं । स्वयें त्रिशुद्धी विधाता ॥२३॥
तेणेंही कल्पादीसीं आपण । नाभिकमळासनीं बैसोन ।
भृगुकश्यपादि पुत्रांसी जाण । हें पूजाविधान उपदेशी ॥२४॥
श्रीमहादेवेंही आपण । हें क्रियायोगविधिविधान ।
भावें भवानीसी जाण । केलें निरुपण एकांतीं ॥२५॥
. . .