श्रीएकनाथी भागवत
एकनाथ महाराज Updated: 15 April 2021 07:30 IST

श्रीएकनाथी भागवत : श्लोक ४७ वा

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.

श्लोक ४६ वा   श्लोक ४८ वा

इति शेषां मया दत्तां, शिरस्याधाय सादरम् ।

उद्वासयेच्चेदुद्वास्यं, ज्योतिर्ज्योतिषि तत्पुनः ॥४७॥

म्यां दीधला शेषप्रसाद । तो शिरीं धरोनि स्वानंद ।

स्थावरमूर्ति जेथ प्रसिद्ध । तेथ उद्वाससंबंध न करावा ॥३६०॥

जंगम जे प्रतिमामूर्ती। तेथ आवाहिली निजात्मज्योती ।

ते उद्वासुनियां मागुती । निजात्मस्थितीं ठेवावी ॥६१॥

मूर्तीमाझारील ज्योति । आणूनियां हृदयस्थितीं ।

मग निजात्मज्योतीसी ज्योती । यथास्थितीं मेळवावी ॥६२॥

विसर्जनान्त पूजास्थिती । ऐकोनि उद्धवाचे चित्तीं ।

साधकां पूज्य कोण मूर्ती । देव ते अर्थी स्वयें सांगे ॥६३॥

. . .