श्रीएकनाथी भागवत
एकनाथ महाराज Updated: 15 April 2021 07:30 IST

श्रीएकनाथी भागवत : श्लोक २२ वा

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.

श्लोक २१ वा   श्लोक २३ वा

अविद्यमानोऽप्यवभासते यो, वैकारिको राजससर्ग एषः ।

ब्रह्म स्वयंज्योतिरतो विभाति, ब्रह्मेन्द्रियार्थात्मविकारचित्रम् ॥२२॥

मुख्यत्वें मन विकारी पूर्ण । त्यासी मिळूनि तिनी गुण ।

नसताचि संसार जाण । विचित्राभरण दाखवी ॥९३॥

मन बुद्धि चित्त अहंकार । आणि अधिष्ठाते सुरवर ।

हे सत्त्वगुणाचे विकार । जाण साचार उद्धवा ॥९४॥

रजोगुणाचीं दशेंद्रियें । पंचभूतें पंचविषये ।

तमोगुणिया जन्म होये । ते जनासी पाहें भुलविती ॥९५॥

जेवीं वोडंबरियाचा खेळ । नसताचि भासे प्रबळ ।

तेवीं त्रिगुणांचें विचित्र जाळ । मिथ्या निर्मूळ आभासे ॥९६॥

ब्रह्म स्वयें अकारण । स्वप्रकाशें प्रकाशमान ।

तेंचि प्रपंचाचें महाकारण । प्रकाशक जाण स्वयें झालें ॥९७॥

जेवीं छायामंडपींच्या नाना व्यक्ती । तद्रूप भासे दीपदीप्तीं ।

तेवीं जगदाकारें स्वयंज्योती । भासें मी चिन्मूर्ति परमात्मा ॥९८॥

एवं प्रपंचाचें जें स्फुरण । तें स्वप्रकाश ब्रह्म पूर्ण ।

हें हातवसूनि ब्रह्मज्ञान । विकल्पच्छेदन हरि सांगे ॥९९॥

. . .