श्रीएकनाथी भागवत
एकनाथ महाराज Updated: 15 April 2021 07:30 IST

श्रीएकनाथी भागवत : श्लोक ३० वा

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.

श्लोक २९ वा   श्लोक ३१ वा

करोति कर्म क्रियते च जन्तुः, केनाप्यसौ चोदित आनिपातात् ।

न तत्र विद्वान् प्रकृतौ स्थितोऽपि, निवृत्ततृष्णः स्वसुखानुभूत्या ॥३०॥

जन्मापासूनि मरणान्त । प्राणी जें जें कर्म करित ।

तें तें कोणी एक प्राचीन एथ । असे वर्तवीत निजसत्ता ॥३३॥

तेथ सज्ञान आणि अज्ञान । प्राचीन कर्में कर्माधीन ।

अज्ञानासी अहंकर्तेपण । ज्ञाते निरभिमान वर्तती कर्मीं ॥३४॥

म्हणसी देहीं असतां प्राण । केवीं नुठी देहाभिमान ।

ज्ञाता स्वसुखानुभवें पूर्ण । अहंकर्तेपण त्या स्फुरेना ॥३५॥

दोराचे सर्पाचा महाधाक । दोर जाणितल्या नुपजे देख ।

तेवीं अनुभविल्या ब्रह्मसुख । अहंता बाधक स्फुरेना ॥३६॥

ऐक योगभ्रष्टाचें लक्षण । त्याचा प्राचीनसंस्कार जाण ।

उपजों नेदी देहाभिमान । योग संपूर्ण सिद्धयर्थ ॥३७॥

जें देहीं नित्य निरभिमान । तेचि ब्रह्मसुखें सदा संपन्न ।

त्यांसी देहींचें कर्माचरण । सर्वथा जाण बाधीना ॥३८॥;

ज्ञाता देहकर्मासी अलिप्त । हेंही अपूर्व नव्हे एथ ।

तो देही असोनि देहातीत । तेंचि श्रीकृष्णनाथ स्वयें सांगे ॥३९॥

. . .