श्रीएकनाथी भागवत
एकनाथ महाराज Updated: 15 April 2021 07:30 IST

श्रीएकनाथी भागवत : श्लोक १ ला

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.

आरंभ   श्लोक २ रा

अथ तत्रागमद्ब्रह्मा, भवान्या च समं भवः ।

महेन्द्रप्रमुखा देवा, मुनयः सप्रजेश्वराः ॥१॥

जो व्यासाचें निजजीवन । जो योगियांचें चूडारत्‍न ।

तो श्रीशुक स्वयें आपण । श्रीकृष्णनिर्याण निरुपी ॥२१॥

शुक म्हणे परीक्षिती । निजधामा निघतां श्रीपती ।

सकळ देव दर्शनार्थ येती । विमानपंक्तीं सवेग ॥२२॥

ब्रह्मा सत्वर आला तेथ । भव भवानीसमवेत ।

इंद्रमुख्य देव समस्त । स्वगणयुक्त ते आले ॥२३॥

सनकादिक मुनिपंक्ती । आले दक्षादि प्रजापती ।

. . .