श्रीएकनाथी भागवत
एकनाथ महाराज Updated: 15 April 2021 07:30 IST

श्रीएकनाथी भागवत : श्लोक ३ रा

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.

श्लोक २ रा   श्लोक ४ था

द्रष्टुकामा भगवतो, निर्याणं परमोत्सुकाः ।

गायन्तश्च, शौरेः कर्माणि जन्म च ॥३॥

कृष्ण पाहावया आवडीं । दृष्टी धांवे लवडसवडी ।

होत डोळ्यां आडाडी । अभिनव गोडी कृष्णाची ॥३०॥

श्रीकृष्णनिर्याणदर्शन । पाहावया उत्साहपूर्ण ।

सत्वर आले सुरगण । पुढती श्रीकृष्णदर्शन आम्हां कैंचें ॥३१॥

सौंदर्याची निजसीमा । घनश्याम सुंदर प्रतिमा ।

तो कृष्ण गेलिया निजधामा । दर्शन आम्हां मग कैंचें ॥३२॥

श्रीकृष्णदर्शनाची गोडी । सुरगणां लागलीसे गाढी ।

यालागीं तें अतितांतडी । आले आवडीं दर्शनार्थ ॥३३॥

श्रीकृष्णकर्में स्वयें वर्णित । कृष्णचरित्रें गीतीं गात ।

मिळोनि सुरवर समस्त । आले दर्शनार्थ सत्वर ॥३४॥

. . .