श्रीएकनाथी भागवत
एकनाथ महाराज Updated: 15 April 2021 07:30 IST

श्रीएकनाथी भागवत : श्लोक ४ था

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.

श्लोक ३ रा   श्लोक ५ वा

ववर्षुः पुष्पवर्षाणि, विमानावलिभिर्नभः ।

कुर्वन्तः सङकुलं राजन्, भक्‍त्या परमया युताः ॥४॥

विमानश्रेणी आकाशीं । तेथ दाटलिया चौपाशीं ।

संमुख देखोनि हृषीकेशी । जयजयकारासी तिंहीं केलें ॥३५॥

देखोनि श्रीकृष्णनाथ । भक्तिउद्रेक जाहलें चित्त ।

दिव्य सुमनांतें वर्षत । मिळूनि समस्त समकाळें ॥३६॥

दिव्य सुमनांचा रोळा । कृष्णा-चौपाशीं विखुरला ।

तेणें श्रीकृष्ण शोभला त्या काळां । घनश्यामलीळा साजिरी ॥३७॥

. . .