भूपाळी

भूपाळी हा मराठी पारंपरिक संगीतप्रकार आहे. देवाला पहाटे जागे करण्यासाठी भूपाळी गाण्याची महाराष्ट्रात सांस्कृतिक परंपरा आहे. सहसा भुपाळ्या भूप रागात बांधलेल्या असतात.


मारुतीची भूपाळी

उठा प्रातःकाळ झाला ।
मारुतीला पाहुं चला ।
ज्याचा प्रताप आगळा ।
विरंचीही नेणतो ॥ ध्रु. ॥

आमुचा हनुमंत साह्यकरी ।
तेथें विघ्न काय करी ।
दॄढ धरा हो अंतरीं ।
तो त्वरीत पावेल ॥ १ ॥

आमुचा निर्वाणींचा गडी ।
तोचि पावेल सांकडीं ।
त्याचे भजनाचे आवडी ।
दॄढ बुध्दि धरावी ॥ २ ॥

थोर महीमा जयाची ।
कीर्ति वर्णवी तयाची ।
रामी रामदासाची ।
निकत भक्ति करवी ॥ ३ ॥