नवसाला पावणारे गणपती- भाग २

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.


स्वयंभू मांदार गणेश, अक्कलकोट

१९६६ साली  श्री स्वामी समर्थांच्या समाधीजवळ हे मांदार गणेशाची मूर्ती सापडली.

जांभेकर महाराजांचा या मांदार गणेश आणि दादरच्या श्री सिद्धिविनायकाच्या गणेशाच्या स्थापनेशी संबध आहे असं समजले जाते.

या मांदर गणेशला मांदार वृक्षाची सोंड आहे. ती सोंड लांबसडक आहे.

या मूर्तीचे शेंदुरलेपन  मोरगावचे श्री ढेरे यांनी केले आहे. हे अतिशय जाज्वल्य असे हे गणेशाचे स्थान आहे.

सोलापुरातील अक्कलकोटला आता मुंबईहून बऱ्याच बस जातात.

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनी मुंबई ते अक्कलकोट जावे आणि तिथेच स्वामी समर्थांच्या समाधीजवळ हे मंदिर आहे.