नवसाला पावणारे गणपती- भाग २

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.


पखालपूरचा गणपती, पखालपूर

पंढरपूरच्या सात सेवाधारी मंडळांपैकी डिंगरे आडनावांच्या मंडळाचा हा गणपती आहे.

हे गणेशस्थान या डिंगरेचा कुलदैवत आहे. पंढरपूरपासून अवघे ४ कि.मी. च्या अंतरावर आहे.

हे तसे थोडेसे आड जागीच आहे. या मंदिरात एकूण २२ कोरीव खांब आहेत यास शिखर आणि गाभारा नाही.  

गणेशची मूर्ती चार फुट उंच आणि ३ फुट रुंद आहे. हे मंदिर हेमाडपपंथी आहे.

मुंबई हुं म्पान्धार्पुरला रेल्वेने जाता येते हे अंतर केवळ ४०० कि.मी. आहे.

पंढरपूर- बार्शी या रस्त्यावर कर्मा फाट्यापासून आत आहे हे मंदिर मुख्य सोलापूर पासून ५० कि.मी आहे.