नवसाला पावणारे गणपती- भाग २

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.


श्री विशाल सिद्धिविनायक माळीवाडा अहमदनगर

हे गणेशस्थान अत्यंत प्राचीन आहे. अहमदनगरचे आधीचे नाव अंबिकानगर असेही होते

या अहमदनगरच्या दक्षिणेला माळीवाडा देवस्थान हे गणेशस्थान आहे.हा गणपती महात्मानगर महात्म्यांच्या समाधीवरील आहे

ही गणपतीची मूर्ती उजव्या सोंडेची असून चतुर्भुज आहे

या गणपतीच्या बेंबीतून शिवलिंग बाहेर आलेले आहे शिवाय त्याला सर्पाचा वेढा आहे ही गणपतीची मूर्ती अकरा फूट उंच आहे .

अनंत चतुर्दशीला रथातून या गणपतीच्या मूर्तीची मिरवणूक निघते

मुंबई पुणे ते अहमदनगर असा रेल्वेने प्रवास केल्यास ३५० किलोमीटरचा आहे.

या गणपती मंदिरात जाण्यासाठी बसने प्रवास करणे केव्हाही सोयीचे पडते.