नवसाला पावणारे गणपती- भाग २

हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.


अक्षत्या गणपती, गुजरवाडी, अहमदनगर.

अहमदनगर शहरातील ब्राह्मण मंडळी मंगल कार्यप्रसंगी देवास अक्षता या ठिकाणी घेउन जातात.म्हणून या गणपतीला अक्षत्या गणपती असे नाव पडले.

पूर्वी या मंदिरात एक विहीर होती. यवनी आक्रमणापासून संरक्षण मिळण्यासाठी ही मूर्ती सुरक्षित विहिरीत ठेवली होती.

ही मुर्ती नंतर एका सुयोग्य वेळेनंतर बाहेर काढण्यात आली होती.

या मूर्तीची उंची साडेतीन फूट असून रुंदी दोन फूट आहे.या मीर या मूर्तीची सोंड मात्र बरीच मोठी आहे आणि नेत्र चांदीचे आहेत.

अहमदनगर शहराच्या मध्यवस्तीतील गुजर गल्लीतील हे गणपतीचे स्थान आहे.