उक्ताड चा महागणपती हा पुरातन पेशवेकालीन स्वयंभू गणेश आहे.
गुहागर अंजनवेल रस्त्यावर हे गणेशस्थान आहे.
भक्तांसाठी प्रलयकारी समुद्राला आवरण्यासाठी देव पश्चिमाभिमुख झाले अशी अख्यायिका आहे.
हे गणेश मंदिर रस्त्यावरच आहे मंदिरात रंगीत आकर्षक अष्टविनायकांचे दर्शनही होते.
मुंबई ते गुहागर बसने प्रवास करता येतो शिवाय मुंबई ते चिपळूण रेल्वेने गेल्यास पुढे तीस किलोमीटर गुहागरला बसने जाता येते.